लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
पवनी/प्रदीप घाडगे: वैनगंगा विद्यालय, पवनी येथे गणित मंडळाच्या वतीने वर्ग ५ वी ते ८ वीकरिता गणित संबोध परीक्षेचे आयोजन करण्यात आले. या परीक्षेत तब्बल ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून परीक्षा दिली.
परीक्षेचे आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य अजय. ठवरे , उपप्राचार्य प्रमोद. मेश्राम , गणित शिक्षक प्रशांत घाटबांधे , मुकेश बावनकर, कुणाल बोरकर , धीरज मोटघरे, विनोद मोहिते , श्रीमती तेलमासरे , श्री. ढेंगरे तसेच रंजना परवरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी आकर्षण निर्माण होऊन त्यांची बौद्धिक क्षमता वाढीस लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. गणित मंडळाच्या वतीने सर्व शिक्षकवर्ग व सहकार्य करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.





