– २३,२४ व २५ एप्रिल रोजी आयोजन
– जय बजरंग बली शंकरपट वागदरा यांचे आयोजन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यात शंकर पटाचा थरार पुनश्च एकदा रंगणार असून व तालुक्यातील वागदरा येथे २३,२४ व २५ एप्रिल रोजी सकाळी १०:३० वाजता जय बजरंग बली शंकरपट यांचे द्वारा भव्य शंकर पटाचे आयोजन करण्यात आले आहे.शंकर पटाचे उद्घाटन मा.हंसराज अहिर यांचे हस्ते पार पडणार असून अध्यक्षस्थानी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांची उपस्थिती राहणार आहे.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून शंकर लालसरे उपस्थित राहणार आहे.
तालुक्यातील वागदरा येथे २३,२४ व २५ एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता निकेश पिदुरकर व राजेश पारखी यांचे शेतात आकर्षक बक्षिसांच्या आतिषबाजीत अन् मान्यवरांच्या उपस्थितीत शंकर पटाचा थरार रंगणार असून इच्छुकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन जय बजरंग बली शंकर पट वागदरा यांनी केले आहे.
या भव्य शंकर पटाचे उद्घाटन अध्यक्ष राष्ट्रीय मागास वर्ग आयोग तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री, भारत सरकार हंसराज अहिर यांचे शुभहस्ते पार पडणार असून अध्यक्षस्थानी वणी विधान सभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार तर प्रमुख अतिथी भाजपा यवतमाळ जिल्हा सचिव शंकर लालसरे उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमास ज्ञानेश्वर चिकटे, तालुका अध्यक्ष भाजपा मारेगाव,वैभव पवार, नगर सेवक, नगर पंचायत मारेगाव,
राहुल राठोड, नगर सेवक, नगर पंचायत मारेगाव,अनुष महाकुलकर, मारेगाव शहर अध्यक्ष भाजयुमो,
प्रशांत नांदे, ता. सरचिटणीस भाजपा मारेगाव,आनंद पंचारे, ता. सचिव भाजपा मारेगाव यांची उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून राजेश पुरी ठाणेदार पो.स्टे. मारेगाव, दादाराव पं. ढोंबरे,सरपंच वागदरा,सुनिताताई वि. जुमनाके, सरपंच बोटोणी,संगिताताई ध. जाधव, उपसरपंच वागदरा,नामदेव चं. सुरपाम, पो. पाटील, वागदरा रामलाल शा. राठोड,पोलीस पाटील दुर्गाडा,सुभाष राठोड, माजी उपसभापती पं.स. पांढरकवडा,गफ्फार खॉ. पठाण, गवराई, अनिल देरकर,माजी जि.प.सदस्य,सुनिल रा. आत्राम, सदस्य वागदरा,पांडुरंग भा. जुमनाके, सदस्य वागदरा,गौराबाई दे. आत्राम, सदस्य यांची उपस्थिती राहणार आहे.





