– भाजीमार्केटसह बाजार पेठेत प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या प्लास्टिकला हद्दपार करण्यासाठी राज्य सरकारने राज्यात प्लास्टिक बंदी लागू केली आहे.या साठी सरकारने दंडात्मक कारवाई सुद्धा निश्चित केली आहे.पण याला बगल देत शहरात अनेक ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर केला जातो आहे.
शहरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.भाजीमार्केट पासुन ते छोट्या मोठ्या वस्तूंची ने-आण करण्यासाठी अगदी बिनधास्तपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जातो.काम झाले की हे प्लास्टिक तसेच रस्त्यावर फेकून दिले जाते.
रस्त्यावर पडलेले प्लास्टिक जणांवरे खात असल्याने याचा वाईट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो.अनेकदा प्लास्टिक पिशव्यांमधुनच शिळे खाद्यपदार्थ फेकण्यात येत असल्याने हेच प्लास्टिक खाऊन गाय,म्हशी अनेक जनावरे सर्रास मृत्युमुखी पडतात.प्लास्टीक चे जाळे जितक्या सहजतेने पसरवले तीतकेच त्याचे अस्तित्व मीटवणे वा कमी करणे कठीण होऊन बसले आहे.
शहरात ठिकठिकाणी रीकाम्या पाण्याच्या बाटल्या,खर्रा पन्नी, प्लास्टिक पिशव्यांचा खच पडलेला आहे.पण यां कचऱ्याची विल्हेवाट लावण्या एवजी हा खच दिवसेंदिवस मोठा होताना दिसतोय.
आजघडीस शहरात प्लास्टिकचा वापर इतक्या मोठया प्रमाणात नी वारंवार होतो आहे की ‘ही कसली प्लास्टिक बंदी’ म्हणावयाची वेळ येऊन पडली आहे.




