– जनहित कल्यान संघटनेकडुन मदत
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
चिंचाळा येथील नाल्यात पडलेल्या जिवंत विद्युत तारांचा स्पर्श होऊन बैल जोडी ठार झाल्याची हृदयद्रावक घटना ता. १४ मे रोजी सकाळी दहा वाजेदरम्यान घडली होती. ऐन खरिप हंगाम तोंडावर असताना सदर घटनेने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असुन शेती कशी करायची हा प्रश्न शेतकऱ्याला पडला असतानाच, शेतकरी, शेतमजुरांचे हित जोपासत तालुक्यात आरोग्य सेवा देणाऱ्या जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा व शिलेदार यांनी “त्या” शेतकऱ्यावर आलेल्या आर्थिक संकटात धाव घेत, ता. २० मे रोजी चिंचाळा येथे शेतकऱ्यास २५ हजार रुपयाची मदत दिली. त्यामुळे शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहर्यावर हास्य बघायला मिळाले.
जनहित कल्याण संघटनेला अजुन एक वर्ष पुर्ण व्हायचे असतांना, घेतलेला वसा पुर्ण करत कधिही मागे
वळुन न पाहता आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत, धान्य, कुठे आर्थिक मदत दिली. पूरग्रस्तांना मदत करण्यात आली. शहरात शव वाहीनी, रुग्ण वाहीका उपलब्ध करून देत सर्व सामान्य जनतेचा आर्थिक भार कमी केला. आत्महत्या करु नये यासाठी जन जागृती कार्यक्रमासह शैक्षणिक, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम घेत आज दहा महिन्याच्या अवधित उत्तुंग भरारी घेत आपला ठसा उमटविल्याने अनेकांच्या उरात धडकी भरली आहे.
अस्तित्वात असलेल्या संघटनासोबत, राजकिय पक्ष सुध्दा दहा महिण्याची जनहित कल्याण संघटनेची गगन भरारी पाहुन दचकल्यागत असल्याचे शहरी भागासह ग्रामिन भागात “जनहित कल्याण संघटना” ही आमची संघटना असल्याचे बोलल्या जात आहे. संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा मात्र या सर्व कार्याचे श्रेय जनहित कल्याण संघटनेच्या शिलेदारांनाच देतात.
दरम्यान चिंचाळा येथील शेतकरी चारुदत्त नामदेव दातारकर यांच्या बैलजोडीचा नाल्यात पडून असलेल्या जिवंत विद्युत ताराच्या स्पर्शाने घटनास्थळीच मृत्यू झाला होता.शेतीचा हंगाम येऊन ठेपला असताना दोन्ही बैलांच्या अशा मृत्यूने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून शेती कशी करावयाची…? हा यक्ष प्रश्न उभा ठाकला असतानाच तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी पिडित शेतकऱ्याने मागणी केली. परंतु “सरकारी काम अन् बारा महिने थांब” असल्याने मदतीस विलंब झाल्यास शेती नुकसान होऊ नये या उदात्त भावनेतून जनहित कल्याण संघटनेच्या शिलेदारांनी चिंचाळा येथे जात सदर शेतकऱ्यास २५ हजार रुपयाची मदत देऊन त्यांच्यावरील थोडा का होईना ईवलासा प्रयत्न केला आहे.
यावेळी संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा, सरोदे समाज विदर्भ प्रांत सचिव अंकुश माफुर, जनहित कल्याण संघटना तालुका अध्यक्ष समीर कुडमेथे, उपाध्यक्ष राॅयल सय्यद, सचिव निलेश तेलंग, गौरव आसेकर, सागर लोणारे, यांचेसह ग्रामस्थ शंकर दातरकर, चारू दातारकर, अनील नावडे, धनराज भट, मुरलीधर दातारकर, युवराज खामनकर, पवन खंडरे, महिंद्र जोगी, प्रवीण दातारकर, प्रकाश सातारकर, संतोष दातारकर, रामकिशन खंदरे, शेखर चिंचोलकर, व ग्रामस्थ उपस्थित होते.





