— कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास प्रशासन सज्ज
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
आठ दिवसांवर मोहरम उत्सव असल्याने शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात यावी यासाठी ता.२६ जुन रोजी सायंकाळी ७ वाजता स्थानिक पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांनी ता.६ जुलै रोजी होऊ घातलेल्या मोहरम उत्सवानिमित्त शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी उपस्थितांना योग्य मार्गदर्शन करत शांतता समितीसह तालुक्यातील नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन सुध्दा यावेळी केले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रविण सुळे पोलीस उपनिरीक्षक विक्की जाधव, शांतता समिती सदस्य, उदय रायपुरे, दुष्यंत जयस्वाल, खालीद पटेल, अविनाश लांबट, वैभव पवार, अजय रायपुरे, राजू घुमे, तथा पत्रकार व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.




