– शहरात मध्यरात्री पासुन अवकाळीची ‘उघडझाप’
लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव सह परिसरात गेल्या दोन दिवसापासून आकाश ढगांनी व्यापले असल्याने उन्हाचे चटके काहीसे कमी जाणवत असताना शहरात काल सायंकाळी वादळी वाऱ्याने हजेरी लावली.पाऊस मात्र कोसळला नव्हता.
शनिवारी मध्यरात्रीपासून वातावरणात कमालीचा बदल होऊन वादळी वारा अन् विजेच्या कडकडाटा सह शहर व परिसरात अवकाळी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. तसेच शनिवारी सकाळी नऊ वाजे दरम्यान शहरासह परिसरात पुन्हा अवकाळीने हजेरी लावली.
प्रादेशिक हवामान पूर्वानुमान केंद्र नागपूर यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार मारेगाव सह परिसरात आज दिवसभर ऊन सावलीचा खेळ सुरू राहून वादळी वाऱ्यासह पावसाच्या दाट सरी कोसळण्याची शक्यता असून नागरिकांनी विशेषतः शेतकरी बांधवांनी सजग राहुन शेतीच्या कामांचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे.





