— नागरिकांनी सहभागी होण्याचे ठाणेदारांचे आवाहन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/मारेगाव…….
गुन्ह्यातील जप्त व बेवारस पडून असलेल्या १३ वाहनांचा शासकीय नियमानुसार लिलाव ता. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता स्थानिक मारेगाव पोलीस ठाण्यात होणार आहे. यात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय सोळंके यांनी केले आहे.

मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यातील व अपघातातील १३ वाहने जप्त आहेत. या वाहनांवर अजून पावेतो कोणीही मालकी हक्क सिद्ध केला नसल्याने ही वाहने पोलीस ठाण्यात बेवारस स्थितीत असून या वाहनांचा लिलाव होणार आहे.
स्थानिक पोलीस ठाण्यात ता. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता गुन्ह्यातील जप्त व बेवारस १३ वाहनांचा शासकीय नियमानुसार लिलाव होणार आहे.यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय सोळंके यांनी केले आहे.




