– तालुक्यातील घोगुलदरा येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यातील घोगुलदरा येथे विज कोसळुन बैल ठार झाल्याची घटना ४ जुलै रोजी रात्री घडली.परिणामी एन शेतीच्या हंगामात शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
रामकिसन झित्रु तुरणकर रा.घोगुलदरा असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.
दरम्यान ता.४ जुलै रोजी त्यांनी रात्री नेहमीप्रमाणे आपला बैल घोगुलदरा शिवारातील शेतात बांधला होता.घोगुलदरा परिसरात ४ जुलैचे रात्री विजेच्या तडाख्यात जोरदार पावसाने हजेरी लावली होती.परिणामी बैलाचे अंगावर वीज कोसळून बैल जागीच ठार झाला.
एन शेतीच्या हंगामात वीज कोसळुन बैल ठार झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.परिणामी योग्य आर्थिक मदत मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्याने केली आहे.





