— बोटोणी शिवारातील घटना, वाघाची दहशत कायम
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/मारेगाव
बोटोणीला लागून असलेल्या जंगल परिसरात गुराखी जंगलाशेजारी गुरे चारण्यासाठी नियमित जातात. मात्र ता. ९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेदरम्यान दबा धरुन असलेल्या वाघाने गोऱ्ह्यावर व म्हशीच्या वगारावर हल्ला करून गोऱ्हा जागीच ठार झाला तर वगार जखमी अवस्थेत असल्याची प्राथमिक माहीती आहे.
दरम्यान ता. ९ डिसेंबर रोज सोमवारला नेहमीप्रमाणे गोपालक अरुण नागोसे बोटोणी लगत असलेल्या जंगलात गोधन चारावयास घेऊन गेले. मात्र शिकारीच्या शोधात असलेला वाघोबा दबा धरुन बसला आहे हे ध्यानीमनी नसतांना वाघोबाने दुपारी ४ वाजेदरम्यान गोऱ्हा व वगारावर हल्ला चढवला यात वगार वाघाच्या तावडीतून सुटून जखमी अवस्थेत पळुन जाण्यात यशस्वी झाले. परंतू वाघाच्या हल्ल्यात मात्र ठार झाला. सदर हल्ला जानबाचा माड परिसरात झाल्याची प्राथमिक माहीती आहे. सदर गोऱ्हा गोसावी मोहजे यांच्या मालकीचा असल्याची माहीती आहे.




