– राज्य महामार्गावरील घटना
– सुदैवाने जीवितहानी टळली
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
वणी-यवतमाळ राज्य महामार्गावरील बोटोनी येथुन काही अंतरावर उभ्या ट्रेलरला दुसऱ्या एका ट्रेलरने मागाहून धडक दिल्याची घटना ७ ऑगस्ट रोजी रात्री ९:३० वाजे दरम्यान घडली.सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
सोमवारी रात्री ९:३० वाजेदरम्यान वणी-यवतमाळ राज्य महामार्गावरील बोटोनी येथून अवघ्या हाकेच्या अंतरावर ट्रेलर उभा होता.
यावेळी मागाहून येणाऱ्या एका दुसऱ्या ट्रेलरने उभ्या ट्रेलरला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की मागाहून येणाऱ्या ट्रेलरचा समोरील भाग अक्षरशः चुराडा झाला. तर उभ्या ट्रेलरचा समोरील भाग पुर्ण:त ट्रेलरच्या मागील भागापासून वेगळा झाला.सुदैवाने या विचित्र अपघातात जीवितहानी मात्र झाली नाही.
