— मांगरुळ येथील सरपंच खाडे यांचे सोबत
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/मारेगाव
मारेगांव तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातुन अपक्ष उमेदवार संजय खाडे यांना सातत्याने पाठींबा वाढत असल्याने वणी विधान सभा क्षेत्रातील अन्य उमेदवारांसाठी ही धोक्याची घंटा ठरेल का??? अशी चर्चा आता तालूक्यातील जनतेतून उमटत आहे. ता.१० नोव्हेंबर रोजी मारेगाव तालुक्यात संजय खाडे यांच्या प्रचाराचा धडका, धडकी भरेल असा पहावयास मिळाला असून यावेळी तालुक्यात राजकीय तथा संघटनात्मक वर्चस्व असलेले जेष्ठ नेते नरेंद्र पाटील ठाकरे, जनहित कल्याण संघटनेचे सं.संस्थापक गौरीशंकर खुराणा, तथा माजी तालूका प्रमुख संजय आवारी या प्रचार दौर्यात प्रामुख्याने असल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे.
ता. १० नोव्हेंबर रोजी अपक्ष उमेदवार संजय खाडे यांनी मारेगाव तालुक्यातील विविध गावांचा दौरा केला. कोलगाव व मांगरुळ येथे भव्य रॅली व प्रचार सभा घेण्यात आली. या रॅलीत हजारो लोकांनी सहभाग घेतला असून प्रचार सभेत संजय खाडे यांनी विकास कसा असावा याबद्दल माहिती देत फक्त एक संधी द्यावे असे आवाहन मतदारांना केले. दरम्यान १० नोव्हेंबर रविवार रोजी तालुक्यातील मांगरूळ या गावातून प्रचाराला सुरुवात झाली. मांगरुळ येथील रहिवाशांनी वाजत गाजत संजय खाडे यांचे स्वागत केले. तर कोलगाव येथील मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात झाली. कोलगाव येथील रहिवाशी मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते. यावेळी मांगरुळ येथील सरपंच प्रमोद आत्राम यांनी अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या सोबत असल्याचे आश्वासन दिले.
जेष्ठ नेते नरेंद्र पाटील ठाकरे यांची तालूक्यात नेहमीच पकड होती आजही त्यांचा शब्द पाळणारे आहेतच. तसेच जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांनी संघटनेच्या माध्यमातून तालुक्यात कोणकोणती कामे केली हे सर्वश्रुत असून अल्पावधितच खुराणा यांना माणनारा एक वर्ग आहे. तर संजय आवारी हे पंचायत समितीचे माजी उपसभापती असून आजपर्यंत त्यांनीसुध्दा गोरगरीब गरजूची अनेक कामे मार्गी लावल्याने त्यांची सुध्दा वेगळीच छाप आहे.
हे तीनही दिग्गज अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या सोबत प्रचार दौऱ्यात असल्याने व खाडे यांच्या खांद्याला खांदा लावून जोमाने जिकरीने प्रचार करत असल्यामुळे तालूका *शिटीमय* झाल्याचे पहावयास मिळत असुन खाडे यांना हा वाढता पाठींबा निवडणुक रिंगणातील अन्य उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरणार असे धडकी भरणारे सुतोवाच आहे.




