– मजुर व पती थोडक्यात बचावले
– गोरज येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
शेतकाम आटोपुन घरी परत येत असताना चालत्या बैलबंडीवर अचानक वीज कोसळल्याची दुःखद घटना ४ सप्टेंबर रोजी दुपारी २:१५ वाजे दरम्यान तालुक्यातील गोरज बस स्टॉप नजीक घडली.यात बैलबंडी वरील एक महिला जागीच ठार झाली तर महिलेचा पती एक मजूर थोडक्यात बचावले.
सुवर्णा संजय कांबळे (३५) असे वीज पडून ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.

दरम्यान सुवर्णा या आपल्या पती संजय महादेव कांबळे व काही मजुरांसह ४ सप्टेंबर रोजी सकाळी शेतात गेल्या होत्या.शेतातील काम आटोपुन दुपारी २:१५ वाजेदरम्यान त्या बैलबंडीवरुन घरी परत येत असताना गोरज बस स्टॉप नजीक त्यांच्या चालत्या बेलबंडी वर वीज कोसळली. यात सुवर्णा या जागीच गतप्राण झाल्या.
यावेळी बैलबंडी वर असलेले सुवर्णा यांचे पती संजय कांबळे व मजुर मोहन नाना काळे हे केवळ नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावले.तर दोन बैल किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.





