– शिक्षण क्षेत्रात हळहळ
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यातील बोटोनी येथील कै.बालाजी पंत चोपने विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक सुनील चोपने यांचे ता.२३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री २:३० वाजेदरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्युसमयी ते ५९ वर्षाचे होते.
सुनील चोपने हे बोटोनी येथील कै.बालाजी पंत चोपने विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक होते.एक वर्षाआधीच आपला कार्यकाळ पूर्ण करून सेवानिवृत्त झाले होते.
दरम्यान मागील काही महिन्यांपासून त्यांना एका दुर्धर आजाराने ग्रासले होते.२३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री त्यांची प्रकृती अचानक खालावली.यातच रात्री २:३० वाजता वणी येथील स्वगृही त्यांची प्राणज्योत मालवली.
मृतक चोपने सरांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,सुन, नातवंड असा आप्तपरिवार आहे.
एक आदर्श शिक्षक व मुख्याध्यापकांच्या अशा अवेळी जग सोडून जाण्याने शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असुन आज सायंकाळी ६ वाजता वणी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.





