– माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेविरोधात काँग्रेस कार्यकर्ते एकवटले
– नागरिकांची लक्षणीय उपस्थिती
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
दोन महिन्यांपूर्वी माणूसकीला काळीमा फासणारी घटना मणिपूर येथे घडली होती.येथील कांगपोकपी जिल्ह्यात दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर दोन महिन्यांनी व्हायरल झाला होता.या अमानवीय घटनेने अवघ्या देशभरात संतापाची लाट उसळली असतानाच २३ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता शहरातील मार्डी चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या अमानवीय घटनेचा जाहीर निषेध केला.तर नैसर्गिक आपत्तीचा बळी ठरलेल्या ईर्शाळवाडी येथील नागरिकांना आदरांजली वाहण्यात आली.
मणिपूर येथील कांगपोकपी जिल्ह्यात ४ मे रोजी दोन महिलांची विवस्त्र धिंड काढुन महिलांना रस्त्यावर फिरवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.४ मे रोजी घडलेल्या घटनेचा व्हिडिओ तब्बल ७७ दिवसांनंतर १९ जुलै रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल होताच ‘त्या’ मानव रुपी जनावराविरुद्ध अवघ्या देशभरात संतापाची लाट उसळली होती.पोलिसांनी त्या घटनेतील मुख्य आरोपीला अटक केली असली तरी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या अमानवीय घटनेचे पडसाद अवघ्या देशभर उमटतानाचे चित्र सर्वदुर दिसून येत आहे.
दरम्यान २३ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता येथील मार्डी चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी तसेच शहरातील नागरिकांनी एकत्र येत मणिपूर येथे घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध केला.तर नैसर्गिक आपत्तीचा बळी ठरलेल्या ईर्शाळवाडी येथील नागरिकांना आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी पुसद अर्बन बँकेचे उपाध्यक्ष व व्यापारी मंडळ (वणी) अध्यक्ष राकेश खुराना,जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व कृ.उ.बा.स.सभापती गौरीशंकर खुराणा, काँग्रेसचे माजी नगरसेवक खालीद पटेल यांचे सह युवक काँग्रेस शहर अध्यक्ष समीर सय्यद,सरोदे समाज संघटनेचे विदर्भ प्रांत सचिव अंकुश माफुर, कम्युनिस्ट पक्षाचे बंडू गोलर, निलेश तेलंग,मारेगाव तालुका काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष शाहरुख शेख, जुनेद पटेल, हंसराज कळंबे सर, योगेश महाडुळे, हंसराज तेलंग, पवन मोहुर्ले, समीर कुडमेथे तसेच शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांसह शहरातील नागरिकांची उपस्थिती होती.
(Source – Google)




