लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव.
गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला राॅकेल या जीवनावश्यक इंधनाचा शासकीय नियमानुसार ता.९ सप्टेंबर रोजी स्थानिक तहसील कार्यालयात दुपारी दोन वाजता लिलाव करण्यात येत आहे. यात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन तहसीलदार यांचेकडून करण्यात आले आहे.
सन २०१७ मध्ये एका गुन्ह्यात तब्बल ८२० लिटर राॅकेल जप्त करण्यात आले होते. या राॅकेलचा लिलाव जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार ता.९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता तहसीलदार मारेगाव यांचे उपस्थितीत तहसील कार्यालयात करण्यात येणार असुन या लिलावात सहभागी होण्याचे आवाहन तहसीलदार मारेगाव यांच्याकडून करण्यात आले आहे.
यासाठी इच्छुकांचे आधार कार्ड अथवा मतदान ओळखपत्र, बोली लावण्यासाठी रु. ५००/- तहसील कार्यालयात जमा करणे, लिलाव होताच १००% रक्कम तात्काळ भरावी, सर्वोच्च बोलीदारानी वेळेत रक्कम न भरल्यास फेरलिलाव घेण्यात येईल व फरकाची रक्कम संबंधिताकडून वसूल केली जाईल. लिलाव मंजूर अथवा नामंजूर करण्याचा अधिकार तहसीलदार, मारेगाव यांच्याकडे राहील.अंतिम बोलीनंतर प्रत्यक्ष मोजणी करून साठा पंचासमक्ष लिलावदाराकडे सुपूर्द केला जाईल.




