लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
चालु वित्तिय वर्षात तालुक्यात पाणी समस्या गंभीर अथवा उग्र होणार नाही याची दक्षता घेत प्रशासनाने वेळेपुर्विच पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजणा व नियोजन केले आहे.
आदिवासी बहुल मारेगांव तालुक्यात ५६ ग्रामपंचायतीचा पसारा असुन २०११ च्या जनगणनेनुसार ७८ हजाराच्यावर लोकसंख्या होती. बारा वर्षाच्या कालावधीनंतर सन २०२१ मध्ये लोकसंख्या एक लाखावर असण्याची शक्यता आहे.दरवर्षी जाणवणाऱ्या पाणी टंचाईवर तालुका प्रशासनाकडुन वेळीच कृती आराखडा तयार केला आहे.
यावर्षी एप्रिल महिन्यात उष्मांक ३९ ते ४० अंशावर असुन उष्णतेच्या दाहकते मुळे, एप्रिल ते जुन या महीण्यातच भुजल पातळी कमी होत असल्याने घरगुती तथा सार्वजनिक बोअर ,विहीरी कोरड्या ठणठणीत होवुन नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागेल ही शक्यता नाकारता येत नाही.
मात्र संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे. स्थानिक संस्थांकडुन पाण्याच्या स्त्रोताबाबत माहीती गोळा करण्यात येवुन, संभाव्य पाणी टंचाई निर्माण होवु शकेल अशा गावांकरिता विहीरी अधिग्रहीत करण्यात येणार असून संभाव्य पाणी टंचाई असणाऱ्या ६ गावांकरिता ६ विहीरी अधिग्रहनासाठी ३.६० लाख खर्चाची तरतुद करण्यात येणार आहे.
संभाव्य विहीर खोलीकरणासाठी ५ लाख असे एकुण ८ लाख ६० हजार रुपयांपर्यंत कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
अधिग्रहन आराखड्यानुसार घोगुलधरा (बिहाडीपोड),तेलाईपोड, सराटी, अर्जुनी, रायपुर, नरसाळा या गावासाठी अधिग्रहन आराखडा तयार असुन सध्या जरी पाणी टंचाई नसली तरी येणाऱ्या काळात संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ तालुका प्रशासनाचा कृती आराखडा तयार असुन आतापर्यंत कुठल्याही ग्रामपंचायत कडुन विहीर अधिग्रहणासाठी प्रस्ताव आलेला नाही.




