– सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन : विद्यार्थ्यांंचा उत्स्फूर्त सहभाग
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
युवक विकास संस्था वणी द्वारा संचालित मारेगाव स्थित महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय तसेच सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाचे अध्यक्ष अरविंद बोबडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून २६ ऑगस्ट रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात अरविंद बोबडे यांच्या अभिष्टचिंतन व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
२६ ऑगस्ट रोजी सकाळी स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात आयोजित अभिष्टचिंतन व सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरविंद बोबडे होते. तर मंचावर सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाच्या अधिक्षीका नलिनी ताकसांडे ,सौ.संध्या बोबडे, प्रमुख अतिथी राजू पिंपळकर, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे सचिव विप्लव ताकसांडे तसेच मुख्याध्यापक हेमंत ताजणे उपस्थित होते.

यावेळी प्रमुख अतिथी राजू पिंपळकर यांनी अरविंद बोबडे यांच्या जीवनावर थोडक्यात प्रकाश टाकला.तर विप्लव ताकसांडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या स्थापनेपासून तर आतापर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांना थोडक्यात अवगत करून दिला. यावेळी अध्यक्षीय भाषणात अरविंद बोबडे यांनी अभ्यासाची सांगड घालत विद्यार्थ्यांनी समोर येऊन उत्कृष्ट कार्यक्रमांचे सादरीकरण करत रहावे असे मनोगत व्यक्त केले.

अभिष्टचिंतन व सत्कार सोहळ्यानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले.यात नृत्य,गीत गायण,भाषण आदी कार्यक्रमांचा समावेश होता.
महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय तसेच सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींचे वस्तीगृह मारेगावचे अध्यक्ष अरविंद बोबडे यांच्या अभिष्टचिंतन व सत्कार सोहळ्यानंतर अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यावेळी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




