– साई मित्र परिवार यांचे आयोजन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून ता.२ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान येथील जगन्नाथ महाराज मंदिरात साई मित्र परिवार यांचे द्वारा महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य निभावले.
गेल्या १३ वर्षापासून मारेगावातील साई मित्र परिवाराने हा वसा जोपासत वेळोवेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करुन अनेक गरजूंना रक्त उपलब्ध करून देत या महान कार्यात नेहमीच खारीचा वाटा उचलला आहे.
दरम्यान याही वर्षी ता.२ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून वसंतराव नाईक रक्तपेढी, यवतमाळ यांचे सौजन्याने येथील जगन्नाथ महाराज मंदिरात ( राष्ट्रीय विद्यालय ) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
संबंधित बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
या महा रक्तदान शिबीरात १०४ नागरिकांनी रक्तदान करून मानवतेचे कर्तव्य निभावले.जमा रक्त वसंतराव नाईक रक्तपेढी,यवतमाळ येथुन गरजुंना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

महा रक्तदान शिबिराचे यशस्वीते करिता साई मित्र परिवारातील सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.




