लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
गणेश उत्सव व ईद ए मिलाद च्या पार्श्वभूमीवर मारेगाव शहरासह तालुक्यातील शांतता अबाधित असावी यासाठी शहराच्या मुख्य व अंतर्गत मार्गावरुन मारेगाव पोलिसांनी ता. १३ सप्टेंबर रोजी ११.४५ ते १२.४५ सलग एक तास ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या नेतृत्वात पथ संचलन करीत आगामी सण तथा उत्सवासाठी मारेगाव पोलीस सज्ज असल्याचा प्रत्यय आला.

आगामी काळात अनेक सण उसत्व असुन शहरासह तालुक्यात गणेशोत्सव व इद ए मिलाद साजरी करण्यात येत आहे. या कालावधीत कायदा, सुव्यवस्था अबाधित रहावी व सलोखा कायम असावा यासाठी पोलीस स्टेशन पासुन महामार्गावरील मार्डी चौक, डाॅ.आंबेडकर चौक, अंतर्गत मार्गावरील गौसिया मस्जिद, जुनी वस्ती, नगरपंचायत, मुख्य बाजारपेठ, तथा मिश्र वस्ती, आदी मार्गांवरून ता. १३ सप्टेंबर रोजी एक तास, पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या नेतृत्वात एक पोलीस निरीक्षक, ४ पोउपनी, २१ पोलीस अंमलदार, होमगार्ड २२ व १ पो.मु. एस एफ हजर होते. यावेळी कर्मचारी यांना योग्य मार्गदर्शन करुन, पो.स्टे. मधील शस्त्र , दारुगोळा व ढाल-लाठी, हेल्मेट चेक करून व्यवस्थित असल्याची खात्री करण्यात आली.




