– मारेगाव तहसील कार्यालयाचा पुढाकार : शेकडो नागरिकांना लाभ
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तहसील कार्यालय मारेगाव द्वारा आयोजित सराटी ग्रामपंचायत मधिल सोनू पोड येथे ता.२९ सप्टेंबर रोजी सेवा महिना उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शेकडो नागरिकांनी सदर उपक्रमाचा लाभ घेतला.
१७ सप्टेंबर पासुन पुढील महिनाभर म्हणजे १६ ऑक्टोबरपर्यंत राज्यात सेवा महिना उपक्रम राबवण्यात येत आहे. राज्य शासनाच्या विविध क्षेत्रीय कार्यालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांबाबत नागरिकांना मोठ्या प्रमाणावर माहिती प्राप्त करून देणे, त्यांना विविध योजनांचा योग्य लाभ घेता येण्यासाठी नागरिकांमध्ये जागरुकता वाढवीने यासाठी सेवा महिना अंतर्गत ठिकठिकाणी विशेष मोहिम आणि लोकाभिमुख उपक्रम राबवण्यात येत आहे.
दरम्यान ता.२९ सप्टेंबर रोजी मारेगाव तहसील कार्यालया द्वारा सराटी ग्रामपंचायत अंतर्गत सोनू पोड येथे सेवा महिना उपक्रम राबविण्यात आला. यावेळी नागरिकांना रेशनकार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना इत्यादी शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत सदर उपक्रमाचा लाभ घेतला.
यावेळी मारेगाव तहसीलदार यू.एस.निलावाड, नायब तहसीलदार अरुण भगत, महसूल नायब तहसीलदार मत्ते, निवासी नायब तहसीलदार ओसीन मडकाम, निवडणूक नायब तहसीलदार किशोर यादव, पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक रमेश वाढवे, मंडळ अधिकारी अमोल घुगाणे, जाधव, संगांयो अ.का. मडावी, सचिन पेंदाने, तलाठी सोयाम, शालिक कनाके,ऑपरेटर चालखुरे, राहुल पोतराजे, विकास चौधरी, सराटी ग्रामपंचायत सरपंच तुळशीराम कुमरे, पोलीस पाटील, शाळेचे मुख्याध्यापक, कोतवाल रोशनी वरखडे, अमिना राहुल मडावी, रविना आत्राम, सेतू ऑपरेटर स्वप्निल, संजू उपस्थित होते.




