– मारेगावात एकदिवसीय धरणे आंदोलन
– शेकडो समाजबांधवांचा सहभाग : निवेदन सादर
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही महाराष्ट्रातील धनगर समाज हा कमालीचा दुर्लक्षीत असुन राणावनात भटकंती करून आपली उपजीविका करतो आहे.परिणामी धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करा या प्रमुख मागणीसाठी मारेगावात ता.५ आक्टोबर रोजी स्थानिक तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी शेकडो धनगर बांधवांनी यात सहभाग घेत तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी ही गेल्या ७० वर्षांपासून प्रलंबित आहे.धनगर समाजातील अनेक कुटुंबे उघड्यावर असून रानावनात भटकंती करून आपली उपजीविका करीत असतात. संविधानिक तरतुदीमध्ये धनगर समाज हा ३६ व्या क्रमांकावर असूनही अजून पर्यंत शासनाने धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी महाराष्ट्रात केलेली नाही.
परिणामी ता. ५ ऑक्टोंबर रोजी धनगर समाज बांधवांनी स्थानिक तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरण आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.यात धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करा या प्रमुख मागणीसह धनगर समाजातील मुला मुलींच्या शिक्षणासाठी अभ्यासिका, वसतिगृह व निवास यांची व्यवस्था वेगळी व्यवस्था करा आदी मागण्या करण्यात आल्या.
सोबतच पुणे येथील महामंडळाच्या प्रस्तावित जागेवर निवासाचे बांधकाम करा, मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेली केस फास्टट्रॅक वर चालवा, मेंढपाळण व्यवसायाकरिता मोफत चराई क्षेत्र उपलब्ध करून द्या, शेळी मेंढी यांचा एक रुपयात विमा काढून द्या आदी विविध मागण्या करण्यात आल्या.
यावेळी धनगर समाज आरक्षण कृती समिती मारेगाव तालुकाध्यक्ष प्रा.संजय लव्हाळे, उपाध्यक्ष माणिकराव पांगुळ, सचिव अरविंद वखनोर, सहसचिव आशिष साबरे, कोषाध्यक्ष अतुल बोबडे यांचेसह शेकडो धनगर समाज बांधवांचा या धरणे आंदोलनात सहभाग होता.




