लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
विषारी कीटकनाशक घेऊन चनोडा येथील एका पन्नास वर्षीय शेतकरी महिलेने आत्महत्या केल्याची घटना ता. ३ मे रोजी घडली असून हळहळ व्यक्त होत आहे.
आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव वैशाली उत्तम धोबे (अंदाजे ५०) असे होते. मृतक धोबे यांच्या पतीची चनोडा येथे शेती असून मागील काही वर्षांपासून सतत पडणारा ओला कोरडा दुष्काळ,त्यामुळे कमी होणारे उत्पन्न याला कंटाळून वैशाली उत्तम धोबे यांनी ता. ३ मे रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्यान विषारी कीटकनाशक प्राशन केल्याची माहिती आहे.
दरम्यान त्यांचे पती उत्तम धोबे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ वणी येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. परंतू प्रकृती खालावत गेल्याने त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, मुलगी आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.




