– विविध कार्यक्रमांचे आयोजन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
अवघ्या देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होतो आहे.परिणामी १५ ऑगस्ट रोजी स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात ‘वृक्षारोपण’ करून ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ व ‘७७ वा स्वातंत्र्य दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सवाचा’ अधिकृत प्रवास १२ मार्च २०२१ रोजी सुरू झाला.आपल्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या ७५ आठवड्यांच्या काउंटडाउनला येथुन सुरुवात झाली आणि एक वर्षानंतर आज १५ ऑगस्ट २०२३ रोजी हा सोहळा संपन्न होतो आहे.
परिणामी स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ व ‘स्वातंत्र्य दिना निमित्त १५ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यात सर्वप्रथम ध्वजारोहण त्यानंतर वृक्षारोपण, विद्यार्थ्यांची भाषणे, गायनाचा कार्यक्रम आदी कार्यक्रमांची रुपरेषा पार पडली.

यावेळी मंचावर युवक विकास संस्था वणी द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे अध्यक्ष अरविंद बोबडे, सचिव विप्लव ताकसांडे,मुख्याध्यापक हेमंत ताजणे, सहाय्यक शिक्षक एम. एम. सोयाम,दुर्गे मॅडम,कु.परचाके, प्रफुल्ल ठाकरे, यांचे सह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




