– जनहित कल्याण संघटनेचा उपक्रम
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
घर घर संविधान अभियान अंतर्गत वणी तालुक्यातील सावरला येथील सम्यक बौद्ध विहार येथे १९ मे रोजी जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांचे मार्गदर्शनात गौतम जीवने यांचे हस्ते भारतीय संविधान पुस्तिकांची भेट देण्यात आली.
भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली.
दरम्यान प्रत्येकाला आपल्या संविधानाची जाण असावी या उद्देशाने वणी तालुक्यातील सावरला येथे घर घर संविधान अभियान राबवित असता येथील विहारात संविधान पुस्तकांची असलेली गरज लक्षात घेता जनहितने त्या अनुषंगाने पुढाकार घेतला.
सम्यक बौद्ध विहार येथे ‘जनहितने’ जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांचे मार्गदर्शनात गौतम जीवने यांचे हस्ते भारतीय संविधान पुस्तिकांची तथा अन्य पुस्तिकांची भेट देत घर घर संविधान अभियानात खारीचा वाटा उचलला.
यावेळी गौतम जीवने यांचेसह सम्यक विहार चे अध्यक्ष देठे,राऊत,प्रितेश लोणारे तथा उपस्थित होते.




