– आपुलकीने विचारपूस : आर्थिक मदतीचा हात
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
नवरगाव येथील सुशीला देवराव लोणारे (७१) यांचे घराला ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता आग लागून त्यांच्या घराचे प्रचंड नुकसान झाले होते. गावातीलच काही होतकरू युवकांच्या मदतीने आग आटोक्यात आणली गेली होती. सदर घटनेची माहिती आमदारांना प्राप्त होताच आमदारांनी प्रशासकीय फौज फाटा घटनास्थळी पाठवून सदर घटनेचा तात्काळ पंचनामा करण्याचा आदेश निर्गमित केला होता.दरम्यान १ नोव्हेंबर रोजी आमदारांनी वृद्धेच्या घरी स्वतः भेट दिली. यावेळी आपुलकीने वृद्धेची विचारपूस करून वृद्धेस आर्थिक मदतही करण्यात आली.
३१ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६ वाजे दरम्यान नवरगाव येथील सुशीला देवराव लोणारे यांच्या घराला काही कारणास्तव आग लागली होती.आगीचा वनवा शेजारील ईतर तीन घरांना आपल्या कवेत घेत असताना गावातीलच काही होतकरू युवकांनी आपल्या जीवाची परवा न करता आग आटोक्यात आणण्याचा कसोशीने प्रयत्न केला.ही आग आटोक्यात आणत असताना काही युवकांना किरकोळ हानी सुद्धा झाली होती.अखेर युवकांच्या अथक प्रयत्नांती वेगाने पसरणारी आग आटोक्यात आली होती.
नवरगाव येथील भाजपच्या शालिनी दारुंडे यांनी सदर घटनेची माहिती तात्काळ आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांना दिली होती. यावेळी आमदारांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पाठवून घटनेचा पंचनामा करण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान १ नोव्हेंबर रोजी आमदारांनी स्वतः सौ. सुशीला देवराव लोणारे यांची भेट घेतली. यावेळी आमदारांनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या त्यांच्या घराची पाहणी केली.यावेळी वृद्धेस सहानुभूतीने विचारपूस केल्यानंतर आर्थिक मदतीचा हातही दिला.
यावेळी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, प्रादेशिक किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष दिनकर पावडे,भाजपा मारेगाव तालुका सरचिटणीस शालिनीताई दारुंडे,मारेगाव नगरसेवक वैभव पवार यांचेसह किशोर कावडे, किशोर दारूंडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.




