– विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
ओकिनावा शोरीन रू शोरिनकान असोसियेशन, इंडिया द्वारा बेल्ट ग्रेडेशन परिक्षेचे आयोजन गजानन महाराज मंदिर हॉल,वणी येथे करण्यात आले होते.या ग्रेडेशन परीक्षेत मारेगाव तसेच वणी येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.यात मारेगावचे महादेव कोवे यांना ब्राऊन बेल्ट बहाल करण्यात आला.
गजानन महाराज मंदिर हॉल,वणी येथे आयोजित बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत मारेगाव येथील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली.
यशस्वी दाभाडे,संकेत परचाके,स्वरा किनाके,स्नेहल किनाके,भविका कनाके,सारा केलोडे, रियान केलोडे, प्रेरना टेकाम या विद्यार्थ्यांना येलो बेल्ट प्रदान करण्यात आला.
यश दाभाडे,चैताली गाडगे,दिप घुमे,रागिनि घुमे,बरीरा कुरेशी, स्वरा गुरनुले या विद्यार्थ्यांना ऑरेंज बेल्ट प्रदान करण्यात आला.तोहीद कुरेशी यांना ग्रीन बेल्ट प्रदान करण्यात आला.तर मारेगावचे महादेव कोवे यांना ब्राऊन बेल्ट बहाल करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील,हॅन्शी शरद सुकदेवे,नागपुर महाराष्ट्र चिफ सिंहान शरद चिकाटे (5th Dan Black Belt),सेन्साई धनंजय बंके (2nd Dan Black Belt),सेंन्साई नरेश मुरस्कर (2nd Dan Black Belt) ,सेंन्साई प्रा.राजेश घुमे (2nd Dan Black Belt)सेंन्साई शारदा ढक (1st Dan Black Belt) यांना दिले.

यावेळी आयोजित कराटे कार्येकमाच्या मंचावर डॉ.प्रा.संदीप केलोडे,डॉ. केलोडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.




