• पाणपोईसाठी मारेगांवातील सामाजिक,राजकीय वलय हरपले
लोकशस्त्र न्युज नेटवर्क: मारेगांव….
संपादकिय
सुर्य आग ओकत असतांना चटके सहन करण्याची वेळ प्रवाशांवर येवून पडली आहे.तळपत्या उन्हात आपली तृष्णा भागविण्यासाठी प्रवाशांना हॉटेलचा आधार घ्यावा लागत आहे.मात्र पाणपोई उभारण्यासाठी शहरातील कोणत्याही सामाजिक अथवा राजकीय पक्षांनी सौजन्य दाखविले नसल्याने प्रवाशांसह प्रामुख्याने महिला तथा विद्यार्थ्यांची पुरती तारांबळ उडत आहे. एप्रीलचा पुर्वाध सुरु असतांना तापमाणात कमालीची वाढ झालेली आहे. तालुक्यात ता. 2 एप्रिल पासून तर आजपर्यंत पारा ४१ अंशावरच आहे. मारेगांव शहर हे राज्य महामार्गावर असल्याने ग्रामखेड्यावरुन येणाऱ्या प्रवाशांची मुख्य बाजारपेठ म्हणुन नेहमीच तोबा गर्दी असते. यातच शहरात सर्वच शासकीय,निमशासकीय कार्यालय असल्याने ग्रामिण भागातील लाभार्थ्यांची नेहमीच वर्दळ असते. सकाळच्या सत्रात शिकवणी वर्गाला व संगणक प्रशिक्षणाला ग्रामिण भागातुन येणाऱ्या विद्यार्थी तथा विद्यार्थीनींचे प्रमाण खुप मोठे आहे. मात्र तळपत्या उन्हात बसथांबा परिसरात बसस्थानक व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता नसल्याने प्रवाशांची पुरती तारांबळ उडत आहे. त्यामुळे प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी हॉटेलचा आधार घ्यावा लागत असल्याने यात विद्यार्थीनी व महिला प्रवाशांची पुरती कुचंबणा होत आहे.
दरम्यान मारेगांव या दहा हजारावर लोकसंख्या असलेल्या शहरात विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्ष असतांना कुणीही पाणपोई उभारुण प्रवाशांची तृष्णा भागविण्याचे सौजन्य आतापर्यंत तरी दाखवीले नाही. मात्र हेच एखाद्या प्रसंगाचे छायाचित्र व वृत्तपत्र किंवा पोर्टल न्युजवर आपले नाव प्रकाशित होण्यासाठी केविलवाना जोरकस प्रयत्न करवित असल्याचे अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात दिसते आहे. मात्र सामाजिक भान हरवलेले राजकीय पक्ष गेले कुठे? हा प्रश्न उंबरठ्यावर येत असतांना तळपत्या उन्हात पाण्याअभावि प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.,नव्हेतर हॉटेलच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. यात बिसलेरी, विकत घेवून प्रवाशांना आर्थिक फटका बसत आहे. तर मारेगांव शहरातील सामाजिक व राजकीय वलय नागरिकांप्रती हरपल्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे विदारक चित्र आहे.
प्रवाशांना सावली व पीण्याचे पाणी मिळेल काय..?
सध्या लोकसभा निवडणूकीचा ज्वर चढला आहे. प्रमुख राजकीय पक्षांकडून प्रचाराचा नारळ फुटला. नेते पुढारी प्रचारात कोण आघाडी घेईल हा विचार करून जोमात आहे. मात्र या प्रचाराच्या कलगीतुऱ्यात सर्वसामान्य जनतेची आजची गरज काय आहे हे पक्षीय पुढारी तथा नेते सोईस्कररित्या विसरत असल्याचे चित्र आहे.
सध्या ज्या ठीकाणी बस थांबा देण्यात आला त्या ठिकाणी तर पाण्याची कुठलीही व्यवस्था नसुन जवळ कुठेही उपहारगृह नाही. उन्हात उभे राहण्याशिवाय प्रवाशांकडे कुठलाही दुसरा पर्याय नाही. त्यामुळे सध्याच्या बस थांबा जवळ पाणी तथा सावलीची व्यवस्था होईल का..? हा भाबडा प्रश्न उपस्थित होत आहे.




