लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या मारेगाव तालुका अध्यक्षपदी मारोती गौरकार यांची दुसर्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे.
मारेगाव तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असली तरी सन २०२० पूर्वी तालुक्यात काँग्रेस पक्षाला सुगीचे दिवस दिसत नसतानांच ऐन कोरोना काळात काँग्रेसचे खंदे व निष्ठावंत मारोती गौरकार गौरकार यांची काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. आणी सन २०२० ते आजतागायत मारोती गौरकार यांनी, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, शाळेच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सबळपणे हाताळत जनमानसात व वरिष्ठांच्या नजरेत आपला ठसा उमटवला.
परिणामी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी विद्यमान अध्यक्ष मारोती गौरकार यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना परत एकदा तालुकाध्यक्षपद बहाल केले.
या निवडीचे श्रेय माजी आमदार वामनराव कासावर, जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल मानकर, काॅग्रेस जेष्ठ नेते नरेंद्र पाटील ठाकरे, माजी बालकल्याण सभापती अरुणाताई खंडाळकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा यांना ते देत आहे.




