— तालूका काँग्रेस चे तहसीलदारांना निवेदन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/मारेगाव
तालुक्यातील शेतकर्यांचे कपाशी हे मुख्य पीक असून शेतकऱ्यांना कपाशीला योग्य भाव मिळत नसल्याने, सीसीआय कापूस खरेदी केंद्र मारेगांव येथे तत्काळ सुरु करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन तालूका काँग्रेस कमिटीकडुन तहसीलदार मारेगाव यांना देण्यात आले.
मारेगांव तालूका हा कापूस उत्पादक तालूका म्हणून प्रसिद्ध आहे. कपाशी पीकावरच शेतकर्यांचे आर्थिक गणित असले तरी वाढती महागाई पाहता कापसाला अपेक्षित बाजार भाव मिळत नाही. शेतकर्यांचा कापूस बाजारात येणे सुरु झाले मात्र तालुक्यामध्ये खाजगी कापूस खरेदी सुरु असल्याने भावामध्ये तफावत असून
शेतकऱ्यांची लुट होत आहे. अगोदरच नापीकीने व कमी भाव असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यात जर सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरु झाले तर किमान हमीभाव मिळेल यासाठी तत्काळ सी.सी.आय. कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे. अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेवुन तालुका काँग्रेस कमेटी आंदोलन करणार असल्याचा इशारा तहसीलदार मारेगाव यांना देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी माजी सभापती, जि.प. यवतमाळ सौ.अरुणाताई अ. खंडाळकर, कृ.उ.बा.स.संचालक वसंत आसुटकर, ता. काँग्रेस कमेटी,अध्यक्ष मारोती गौरकार,संचालक, वसंत जिनिंग, वणी गजानन खापणे, यादव पांडे, खालीद पटेल, दयानंद कुडमथे, तुळशीराम कुमरे, सुधाकर धांडे, गणू पाटील थेरे, युवराज घोसले, मारोती सोमलकर, माणिक पांगूळ, अशोक धोबे, अरविंद वखनोर उपस्थित होते.




