– कृ. उ.बा.समितीत विदेही सदगुरु जगन्नाथ बाबा प्रतिमेचे अनावरण
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
राजकारण हे जातीपातीच्या पलीकडे जावुन सर्व समावेशक असावे. सर्व धर्म समभाव हीच राजकारणाची शिकवण असुन जातीपातीचे राजकारण करणार नसल्याचे मनोगत कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तथा जनहित कल्याण संघटना संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सदगुरु जगन्नाथ बाबा प्रतिमेच्या अनावरण प्रसंगी ता. १६ जुन रोजी बाजार समितीच्या सभागृहात व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सभापती कृ उ बा समिती नरेंद्र पाटील ठाकरे तर प्रमुख पाहुणे उप सभापती जीवन काळे, कृ.उ.बा. संचालक अविनाश लांबट, खरेदी विक्री महासंघ अध्यक्ष रोगे पाटील, वसंत जिनींग संचालक रवींद्र धानोरकर, गजानन खापणे, माजी उप सभापती विजय धानोरकर, नगर सेवक शंकर मडावी, मनोहर किन्हेकर यांची विशेष उपस्थिती होती.
मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डचे नामकरण विदेही सदगुरु जगन्नाथ बाबा असले तरी आतापर्यंत जगन्नाथ बाबांची प्रतिमा नसल्याने नव्यानेच सभापती पदाची सुत्रे हातात घेतल्यानंतर गौरीशंकर खुराणा यांनी सर्व संचालकांना विश्वासात घेत ता.१६ जुन रोजी प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.या अनावरण प्रसंगी माजी सभापती नरेंद्र पाटील ठाकरे यांनी सर्व संचालक मडळास व सभापती यांना शुभेच्छा देत थोडी फार नाराजी ही प्रत्येक पक्षात चालत असुन कोणीही काँग्रेस सोडुन जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
या कार्यक्रमात अनेकांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर विदेही सदगुरु जगन्नाथ बाबांची आरती करुन प्रसाद वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारोती गौरकार प्रास्ताविक यादव काळे तर सरोदे समाज संघटनेचे विदर्भ प्रांत सचिव अंकुश माफुर यानी आभार प्रदर्शन करुन प्रत्येक महिन्याच्या १६ तारखेला आरती व प्रसादाचा कार्यक्रम घेण्यात यावा अशी उपस्थितांसमोर सभापती व संचालक मंडळास विनंती केली.
अन् शेतकरी बबन काकडेंना अश्रु अनावर झाले…
ता. ७ जुन म्हणजे मशागतीचा शेवटचा दिवस कारण ता. ८ जुन मृग नक्षत्राची सुरवात. येथुनच खरिपाच्या पेरणीला सुरवात करतात. मात्र ता. ७ जुन रोजी मच्छिंद्रा येथील शेतकरी बबन लक्ष्मण काकडे यांच्या जोडीतील एक बैल विद्युत धक्क्याने जागेवरच मृत झाला. एक बैल गेल्याने शेतकऱ्यावर आभाळ कोसळल्यागत परिस्थिती झाली.
शासकीय कामाला वेळ लागणार ही बाब हेरुन तालुका काँग्रेस च्या वतीने विदेही सदगुरु जगन्नाथ बाबा प्रतिमेच्या अनावरण प्रसंगी खारीचा वाटा उचलत शेतकरी बबन काकडे यांना रोख १६ हजार रुपयाची मदत दिली अन् या अनपेक्षित मदतीने, मदत स्विकारते समयी शेतकऱ्याने अश्रुला वाट मोकळी करुन दिली व उपस्थितांचे डोळ्यात अश्रु साठवुन आभार मानले.





