– मारेगाव तालुक्यातील मार्डी येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील मार्डी येथे एका इसमावर कुऱ्हाडीने सपासप वार करुन इसमास ठार केल्याची खळबळजनक घटना ९ ऑगस्ट रोजी रात्री ८:४५ वाजेदरम्यान घडली.या धक्कादायक घटनेने तालुक्यात पुरती खळबळ उडाली आहे.
कैलास उर्फ गोलू बंडू सलाम (२२) रा .मजरा असे या रक्तरंजित थरारात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
प्रदीप गोविंद भारशंकर रा.मार्डी असे युवकावर कुऱ्हाडीने वार करणार्या संशयिताचे नाव आहे.
दरम्यान आज रात्री ८:४५ वाजे दरम्यान कैलास व प्रदीप या दोघांमध्ये काही कारणास्तव मार्डी येथील आठवडी बाजार चौकात वाद झाला.शाब्दिक वादावादीने उग्ररूप धारण केल्याने संशयित आरोपी प्रदीपने कैलासच्या गळा व मानेवरती कुऱ्हाडीने सपासप वार केले.यात कैलास हा गंभीर जखमी झाला होता.
गंभीर जखमी कैलास यास मार्डी येथून जनहित कल्याण संघटनेच्या रुग्णवाहिकेने वणी येथील रुग्णालयात दाखल केले असता तिथे त्याची प्राणज्योत मालवली.
या धक्कादायक घटनेने तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.




