लोकशस्त्र न्युज नेटवर्क/मारेगाव
मोरेश्वर ठाकरे/मारेगाव.
दैनिक देशोन्नतीचे राळेगाव शहर प्रतिनिधी प्रमोद गवारकर यांच्या मातोश्री स्व. सौ. सिंधुबाई गोविंदराव गवारकर (वय ६५) यांचे शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी पहाटे २ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
मातृत्व, माया आणि संस्कारांचा आधार असलेले मातृछत्र हरपल्याने गवारकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्व. सिंधुबाई गवारकर यांच्या प्रेमळ आणि ममत्वपूर्ण सहवासाच्या आठवणी आता कुटुंबीयांच्या स्मरणात कायमच्या राहणार आहेत. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, मित्रपरिवार, आप्तेष्ट तसेच पत्रकारिता क्षेत्रातील सहकाऱ्यांनी शोक व्यक्त केला.
स्व. सिंधुबाई गवारकर यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि गवारकर परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.






