— आईच्या मायेचा स्पर्श, घरच्या जेवणाची ऊब आणि वेळेवर सेवेतून विश्वासाचा नवा अध्याय
मारेगाव/ मोरेश्वर ठाकरे…….
आजच्या यंत्रमानवासारख्या धावत्या जीवनशैलीत माणूस अनेक गोष्टी कमावत आहे, पण नकळत काही अनमोल गोष्टी हरवतही चालला आहे. त्यात सर्वात मोठी उणीव म्हणजे घरच्या स्वयंपाकाची चव, आईच्या हातच्या घासाची माया आणि जेवणातून मिळणारी आत्मीय ऊब. दिवसाची धावपळ, नोकरी-व्यवसायाची लगबग आणि वेळेची कमतरता यामुळे अनेकांना घरगुती जेवण हा जणू दुर्मिळ झालेला आनंद वाटू लागला आहे.
अशा काळात मारेगावात सुरू झालेली ‘श्री महालक्ष्मी घरगुती टिफिन’ सेवा ही केवळ व्यवसायाची सुरुवात नसून, घरच्या चवीची परंपरा जपणारा एक संस्कारमय उपक्रम ठरत आहे. “चव घरची… काळजी तुमची… जबाबदारी आमची…” या हृदयस्पर्शी ब्रीदवाक्यासह सुरू झालेल्या या सेवेमुळे नागरिकांना आता घरगुती, पौष्टिक आणि स्वादिष्ट जेवणाचा आनंद सहज उपलब्ध होणार आहे.
या टिफिन सेवेमध्ये प्रत्येक पदार्थ केवळ पोट भरण्यासाठी नव्हे, तर मन तृप्त करण्यासाठी बनवला जातो. गरमागरम भातातून उठणारी वाफ, रुचकर वरणाचा सुगंध, मऊसूत पोळ्यांचा स्पर्श आणि चविष्ट भाजीची लज्जत. या प्रत्येक घासात घराच्या स्वयंपाकघरातील जिव्हाळा अनुभवायला मिळतो. जणू प्रत्येक डब्यात आईच्या हातची माया आणि गृहलक्ष्मीची आत्मीयता भरलेली आहे.
विशेष म्हणजे, स्वच्छता आणि गुणवत्तेबाबत येथे कोणतीही तडजोड नाही. ताजे व दर्जेदार साहित्य, स्वच्छ व हायजेनिक पद्धतीने तयार होणारे अन्न, सुरक्षित पॅकिंग आणि वेळेवर डिलिव्हरी ही या सेवेमागची प्रमुख ताकद आहे. त्यामुळे ग्राहकांना फक्त चवच नव्हे, तर विश्वासही दिला जात आहे.

आज फास्टफूडच्या चकाकीत अनेकदा आरोग्य मागे पडते परंतु ‘श्री महालक्ष्मी घरगुती टिफिन’ हा उपक्रम आरोग्य, चव आणि संस्कार यांचा सुंदर संगम घडवतो. घरापासून दूर राहणारे विद्यार्थी, नोकरदार, कर्मचारी किंवा स्वयंपाकासाठी वेळ नसलेली कुटुंबे,सर्वांसाठी ही सेवा जणू घरच्या उबदार स्वयंपाकघराचा विस्तार ठरत आहे.
प्रो. प्रा. किरण पवार ( ७४९९२६०७८२ / ९६५७१०००१६ )यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या उपक्रमाने अल्पावधीतच अनेकांची पसंती मिळवली आहे. माधव नागरी, वॉर्ड क्रमांक ६, साई मंदिराजवळ येथून ही सेवा उपलब्ध असून, नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
शेवटी एवढेच…….
जेवण हे फक्त भूक भागवण्यासाठी नसते, ते नात्यांची ऊब, मायेचा स्पर्श आणि संस्कारांची चव जपणारे माध्यम असते. आणि हाच अनुभव प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचे सुंदर कार्य ‘श्री महालक्ष्मी घरगुती टिफिन’ करत आहे.
“चव घरची… सेवा आपुलकीची… आणि समाधान मनापासून!”





