— ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट संस्थेचा पुढाकार
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट संस्थेच्या पुढाकाराने वन हक्क प्राप्त ग्रामसभा तालुका स्तरीय अभिसरण- समन्वय कार्यशाळेचे आयोजन ता.७ एप्रिल २०२५ रोजी पंचायत समिती मारेगाव च्या सभागृहात सकाळी ११ ते पाच वाजता करण्यात आले होते. यावेळी ग्रामिण मुक्ती समस्या ट्रस्ट चे कार्यक्रम संचालक श्रीकांत लोडम, वन परिक्षेत्र अधिकारी हटकर, पंचायत समिती एपीओ साहारे तहसील कार्यालयाचे ठाकरे, तालुका समन्वयक प्रफुल उके, सुनिता सातपुते, यांचेसह मारेगाव तालुक्यातील CFR प्राप्त १५ गावातील सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामसभा सदस्य, फेलो उपस्थित होते.
सामुहिक वन हक्क व्यवस्थापन समिती मजबूत करण्यासाठी ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट संस्थे मार्फत राबविल्या जात असलेल्या शाश्वत उपजीविका व पर्यावरण सुरक्षा प्रकल्पा अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील २२० सामुहिक वन हक्क प्राप्त गावात कम्युनिटी युथ फेलोशिप प्रोग्राम (CYFP) राबविल्या जात असून त्याचाच एक भाग म्हणून मारेगाव तालुक्यातील १५ गावांमध्ये हा प्रकल्प राबविला जात असुन लोडम यांनी ३० नोव्हेंबर २०२१ चा रोहयो पोर्टल वर नोंदणी करण्याबाबतचा शासन निर्णय स्पष्ट करत पुढील विषयावर सुध्दा चर्चा करण्यात आली.
जिल्हा व तालुका ग्रामसभा महासंघ रचना व कार्यपद्धती, प्रत्येक तालुक्यातील कन्व्हर्जन उपजिवीका सुरक्षा सुनिश्चित करुन पुढे घेऊन जाण्यासाठी तालुका प्रकल्पाची ओळख, तालुका कन्व्हर्जन समितीचे भूमिका व जबाबदारी, यासह वन हक्क प्राप्त गावासाठी असणाऱ्या विविध विषयावर ता. ७ एप्रिल रोजी पंचायत समिती सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे संचालन तालुका समन्वयक प्रफुल उके यांनी तर प्रास्ताविक ग्रामिण मुक्ती समस्या ट्रस्ट चे कार्यक्रम संचालक श्रीकांत लोडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी युथ फेलो सुनील सोयाम, शारदा कोरझरे ,पिंकी टेकाम ,निशिगंधा गावंडे ग्रामसभा महासंघाचे सदस्य यांनी केले होते.




