लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथे वाणिज्य विभागाच्या माध्यमातून शेअर मार्केट या विषयावर ता.१ मार्च रोजी एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शेअर मार्केट विषयी जागृत व्हावी व त्यांनी शेअर खरेदी कसे,केव्हा करावे या उद्देशाने या कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना कोणत्या पद्धतीची काळजी घ्यावी व त्या संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून सेबीचे स्मार्ट ट्रेनर डॉ. अनिल जाधव यांना शेअर मार्केटमध्ये शेअर खरेदी करत असताना कोणत्या पद्धतीची काळजी घ्यावी व ती कोणत्या बाबीचा अभ्यास करावा या संदर्भाची सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली. दुसरे प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. सुभाष पटेकर यांनीही शेअर मार्केटच्या संदर्भात आता कोणत्या संधी उपलब्ध आहे आणि केव्हा खरेदी व विक्री करावी या संदर्भात विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन प्रा. डॉ. संतोष गायकवाड यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. माधुरी तानुकर यांनी आणि आभार प्रा. डॉ. प्रवीण कुलकर्णी यांना केले.
महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी मित्र या ऑनलाईन कार्यशाळेला उपस्थित होते.




