— गुन्हा दाखल,संशयीत पोलीसांच्या ताब्यात
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/मारेगाव
तालुक्यातील एका पाड्यावर ता.२७ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेदरम्यान एका २३ वर्षीय युवकाने नग्न अवस्थेत घरात शिरून २२ वर्षीय महाविद्यालयीन युवतीच्या विनयभंगाचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल होताच संशयीत आरोपीविरुद्ध मारेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीतास मारेगाव पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
मारेगाव तालूका हा आदिवासीबहुल असुन गाव,पाड्यात वास्तव्यास असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अशाच एका पाड्यावर एक युवती वडील, आजी आणि बहिणीसोबत वास्तव्यास असून त्यांच्या घराचे बांधकाम सुरु असल्यामुळे बांधकामाचे बाजूला टिन आणि ताटव्याचे शेड करून राहते. दरम्यान ता.२७ डिसेंबरच्या रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून वडील बाजूच्या गोठ्यात झोपायला गेले तथा दोन मुली आपल्या आजीसोबत टिन आणि ताटव्याच्या शेडमध्ये झोपलेल्या होत्या. रात्री ११ वाजेदरम्यान एक मुलगी लघुशंकेसाठी उठली त्यावेळी मात्र विद्युत पुरवठा खंडित झाला होता. लघुशंका करून घरात येत असतांना अचानक विद्युत आल्याने गावातीलच २३ वर्षीय यशवंत रघु आत्राम हा नग्न अवस्थेत घरात शिरून तक्रारदार तसेच तिच्या बहिणीकडे वाईट उद्देशाने जात हात लावण्याचा प्रयत्न करीत असतांनाच सदर मुलगी जोरात ओरडली. मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकताच वडील धावत आले. तेव्हा संशयीत यशवंत रघु आत्राम हा तिथून पसार झाला.
ता.२८ डिसेंबरला सदर मुलीने आपल्या आईवडीलासोबत मारेगाव पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंद करुन संयीतास ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोळंखे यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव पोलीस करीत आहेत.




