— कर्मचारी व वे.को.लि.भागातील समस्या सोडवण्याचे खाडे यांचे वचन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क / मारेगाव
संजय खाडे यांची वे.को.लि नागपूरच्या सुरक्षा समिती सदस्यपदी (टी.एस.सी मेंबर) नियुक्ती करण्यात आली असून वणीतील एएसएल लॉन येथे कोयला क्षेत्रीय सभा (वणी क्षेत्र) अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी संजय खाडे यांनी वे.को.लि कर्मचारी व वेकोलि भागातील अधिकाधिक समस्या सोडवण्याचे अभिवचन उपस्थितांना दिले.

दरम्यान एचएमएस संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व कोयला श्रमिक सभेचे अध्यक्ष शिवकुमार यादव, शरद धांडे, महामंत्री व संचालन समिती सदस्य वेकोलि, दीपक जयस्वाल कोषाध्यक्ष व अध्यक्ष वेकोलि वणी क्षेत्र, विकास सोनटक्के महामंत्री, वणी क्षेत्र यांची प्रमुख उपस्थिती होती.
संजय खाडे यांनी कामगारांचे हक्क, कामगार कल्याण व संघटनेच्या मजबुतीवर चर्चा केली. मोठ्या पदामुळे आता जबाबदारी वाढली आहे. वेकोलिच्या सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी व वेकोलि भागातील समस्या सोडवण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन नवनियुक्त सुरक्षा समिती नागपूर विभाग सदस्य संजय खाडे यांनी वे.को.लि कर्मचारी व वेकोलि भागातील अधिकाधिक समस्या सोडवण्याचे अभिवचन दिले.
या कार्यक्रमाला हिंद मजदूर सभा H.M.S. युनियन व वणी क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती होती. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वेकोलि खाण क्षेत्रातील कामगार उपस्थित होते. वेकोलिच्या सुरक्षा समितीचे सदस्य हे एक मोठे व जबाबदारीचे पद आहे. संजय खाडे यांच्या नियुक्तीमुळे वेकोलि कर्मचारीवर्गात समाधान व्यक्त होत आहे. खाडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे .
संजय खाडे हे आपल्या नियुक्तीचे श्रेय एच.एम.एस. संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवकुमार यादव यांना देत आहे.





