लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
नवरगांव येथील माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेसचे माजी यवतमाळ जिल्हा सरचिटणीस अरुण नक्षणे यांची यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी (ओबीसी) विभागाच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तालूक्यातील नवरगांव येथील काँग्रेस विचारसरणीचे अरुण नक्षणे यांना राजकारणाची आवड असल्याने, विकासाभिमुख कार्य करीत असतांना नवरगांव येथे अरुण नक्षणे यांनी सरपंच पद भुषविले. त्यांनंतर पक्ष बांधिलकी जपत नक्षणे यांनी ग्रामीण भागात पक्ष संघटनावर सुध्दा भर दिला. त्यांच्या कार्याची पावती म्हणून अरुण नक्षणे यांनी यवतमाळ जिल्हा सरचिटणीस पद सुध्दा भुषविले. त्यांची कार्य करण्याची हातोटी वरीष्ठ पातळीवर लक्षात घेत काँग्रेसच्या नेत्या सोनिया, गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहूल गांधी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (ओबीसी) विभाग अध्यक्ष
भानूदास माळी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष संघटन आणखी मजबूत करण्या करिता व काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण सर्व सामान्या पर्यंत पोहचविण्याकरिता अरुण नक्षणे यांची यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती म्हणजे वरीष्ठांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास असुन या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष संघटन सुदृढ करण्यासाठी प्रयत्न करुन, पक्षाला नव्या जोमाने उभारी देण्याचा माझा मानस असेल. आणि या नियुक्तीचे श्रेय माजी आमदार वामनराव कासावार, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती अरुणाताई खंडाळकर, तथा काँग्रेस ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष इंजि. अरविंद वाढोणकर यांनाच आहे.
अरुण नक्षणे, उपाध्यक्ष, यवतमाळ जिल्हा,
काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग.




