— किन्हाळा येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील किन्हाळा येथे ता. २ जूलै रोजी दुपारी १.३० वाजेदरम्यान टीन व्यवस्थित करत असतांना एका ४२ वर्षीय इसमाचा शॉक लागून मृत्यु झाल्याची घटना घडली.
शॉक लागून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव संजय संभाजी बोढाले (४२) असून ते किन्हाळा येथे वास्तव्यास होते. सध्या पंतप्रधान आवास योजने अंतर्गत तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरकुलची कामे सुरु आहे. यांचे सुध्दा घरकुल बांधकाम सुरु असल्याने राहण्यासाठी बाजूलाच कच्चे टीन शेड बांधून राहत होते.
यंदा पावसासोबत हवा सुध्दा खुप जोरदार असल्याने टीन सरकल्यामुळे पाणी गळत होते. टिनांला जिवंत विजेचा प्रवाह लागलेला होता हे संजयच्या ध्यानीमनी नव्हते. त्यामुळे टिनेला हात लावताच संजयला शॉक लागला. यात तो बेशुद्ध होऊन खाली पडला. लगेच त्याला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी संजयला मृत घोषित केले.
मृतक संजय यांचे पश्चात वडील, पत्नी, अपंग मुलगी, मुलगा, एक भाऊ, दोन बहिणी आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. संजयच्या मृत्यूने परिसरावर शोककळा पसरली आहे.
