– वणी आगार व्यवस्थापकांना निवेदन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मार्डी परिसरातुन मारेगावात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाने नियमित बस सेवा सुरू करावी अशा आशयाचे निवेदन मनसेचे मारेगाव तालुकाध्यक्ष रुपेश ढोके यांचे नेतृत्वात असंख्य मनसे सैनिकांनी ता.७ नोव्हेंबर रोजी वणी आगार व्यवस्थापकांना दिले.
शाळा-महाविद्यालयांच्या वेळेवर अनेक मार्गावर बससेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो ही बाब आहे.मनसेने सदर बाबीवर वारंवार प्रकाश टाकला.वणी तालुक्यातील विवीध मार्गावर विद्यार्थांच्या गैरसोयी टाळण्यासाठी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी अनेक बस फेऱ्या सुरू करुन दिल्या.
दरम्यान मारेगाव तालुक्यातील मार्डी परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शाळांच्या वेळेवर बस सेवा सुरू करण्याची गरज पालकांकडून व्यक्त करण्यात येत होती.महाराष्ट्र नवनिर्माण सेना मारेगाव तालुक्याच्या वतीने वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इर्शाद खान यांच्या उपस्थितीत मारेगाव तालुकाध्यक्ष रुपेश ढोके यांनी ता .७ नोव्हेंबर रोजी वणी आगार व्यवस्थापक अभिजित कोरटक यांची भेट घेत याविषयी सविस्तर चर्चा केली.यावेळी मार्डी-मारेगाव बस फेरी शाळेच्या वेळेवर नियमित सूरू करा अशी मागणी करण्यात आली.परिणामी मागणीची दखल घेत परिवहन महामंडळाकडूनही बस तात्काळ चालू करण्यात येईल अशी ग्वाही आगार व्यवस्थापकांनी मनसेला दिली.
यावेळी मनसेचे मारेगाव तालुकाध्यक्ष रुपेश ढोके यांचे सह अजिद शेख, उदय खिरटकर,अनंता जुमडे, गणेश क्षीरसागर, रोहित हस्ते, शुभम दाते आदी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी,महाराष्ट्र सैनिक व शाळकरी विद्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते.




