– कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सभा
– ओबीसी कृती समन्वय समिती मारेगाव यांचा पुढाकार
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
अवघ्या महाराष्ट्रात ओबीसी बांधवांची स्थिती अत्यंत बिकट असताना त्या अनुषंगाने महामोर्चाच्या नियोजना संबंधी ५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथे ओबीसी कृती समन्वय समिती मारेगाव यांच्या पुढाकाराने सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वपक्षीय ओबीसी बांधवांनी सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
महाराष्ट्रात सर्वत्र ओबीसी बांधवांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. परिणामी स्वहक्काकरिता सर्व ओबीसी बांधवांनी आज एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे.
दरम्यान ५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथे ओबीसी महामोर्चा नियोजना संबंधी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सभेस ओबीसी संघटनेचे यवतमाळातील पदाधिकारी प्रदीप वादाफळे,शैलेश गुल्हाने, महाडुळे, तीखे,फेंडर ,राजू देशमुख, रमेश ठाकरे, ऍड. राजेंद्र महाडुळे, खरोडे ,राजाभाऊ पोटे, साहेबराव जुनघरे, सतीश भोयर आदी उपस्थित राहणार आहे.
परिणामी सदर सभेस सर्वपक्षीय ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ओबीसी कृती समन्वय समिती मारेगाव यांनी केले आहे.




