– वणीत गरबा महोत्सवास लोटला अथांग जनसागर
– मौल्यवान बक्षिसांची उधळण
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मनसे नेते राजु उंबरकर यांनी आयोजित केलेल्या मनसे गरबा महोत्सवाचा नुकताच समारोप झाला.शारदीय नवरात्रोत्सव निमित्ताने या गरबा महोत्सवाचे आयोजन वणी येथे मनसे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. गरबा महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मध्यरात्री ३ वाजेपर्यंत गरबा महोत्सवाची रंगत रंगली. विजेत्या स्पर्धकांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला.यावेळी गरबा रसिकांच्या रेकॉर्ड ब्रेक गर्दीने हा कार्यक्रम साजरा झाला.
वणी गरबा महोत्सवास परिसरातील गरबा रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती.गरब्याच्या विविध गाण्यांवर तरुण, तरुणी, महिलांसह सर्वांनी गरबा खेळण्याचा अगदी मनमुराद आनंद लुटला.मनसे पक्षनेते राजू उंबरकर गेल्या अनेक वर्षापासून हा उत्सव साजरा करत असतात. त्यास वणीकरांनी दिलेला प्रतिसाद मोठा होता.
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात असणाऱ्या बहिरेवाडी गावातील शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांनी वयाच्या अगदी १८ वर्षी देशासाठी शहीद झाले. जवान ऋषिकेश जोंधळे यांची लाडकी बहिण कल्याणी जोधळे या गेल्या आठ दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गरबा महोत्सव फेसबुक लाईव्ह घ्या माध्यमातून पाहत होत्या. त्यांच्या वतीने दिशा प्रवीण क्षीरसागर या स्पर्धकाला ११०० रुपयाचे पारितोषिक देण्यात आले.
गरबा उत्सवात विजयी स्पर्धकांना प्रथम विजेत्यास ई-बाईक, द्वितीय बक्षिस लॅपटॉप, तृतीय बक्षिस चांदीची समई, चतुर्थ बक्षिस सोन्याची नथ, पाचवे बक्षिस गेअरची सायकल, सहाव्या विजेत्यास पैठणी साडी, सातव्या विजेत्यास मोबाईल, आठवे शॉकपची सायकल तर नवव्या विजेत्यास पैठणी साडी असे क्रमशः बक्षिसे देण्यात येणार होती.

विजेत्यांमध्ये अनुक्रमे पाहिले करिष्मा नवले, दुसरे स्वाती बरसागरे, तिसरे सुवर्णा उईके, चौथे मिताली पांडे, पाचवे संयुक्ता ढवळे, सहावे परी जोगी, सातवे सृष्टी मालिकर, आठवे आयुशी आगबलवार, नऊवे दिव्या सोनकर यांचा समावेश आहे. यावेळी उंबरकर यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करत त्यांना बक्षीस प्रदान केले. तर याच बरोबर विविध रोख रक्कमेचे पारितोषिके आणि बक्षिसांचे वितरण यावेळी करण्यात आले.

या प्रसंगी मनसेचे नेते आणि आयोजक राजु उंबरकर, राकेश खुराणा, वसंत जिनिंग अध्यक्ष आशिष खुळसंगे, लो. टिळक महाविद्यालयाचे प्रा. खानझोडे, दिनेश गोयल,सुर,आशिष काळे, अनिल पाटिल, सुनिल पाटील, वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान,मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, मारेगाव तालुकाध्यक्ष रुपेश ढोके, शहराध्यक्ष शिवराज पेचे,अजिद शेख, लक्की सोमकुंवर, महीला जिल्हाध्यक्ष अर्चना बोधाडकर, माजी नगराध्यक्षा प्रिया लभाणे, संस्कार तेलतुंबडे, वैभव पुरानकर, गौरव पुरानकर, संस्कार तेलतुंबडे, हिमांशू बोहरा यांचेसह सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीश कामारकर तर आभार जतीन राउत यांनी मानले.





