– पोलीस ठाण्यात सभा : सर्वानुमते निर्णय
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
असत्यावर सत्याचा विजय म्हणून दरवर्षी दसऱ्याला रावण दहन केले जाते.परंतु रावण दहन करू नये अशा आशयाचे निवेदन आदिवासी समाज बांधवांनी मारेगाव पोलीस ठाण्यात दिले होते.परिणामी मारेगाव ठाणेदार जनार्दन खंडेराव यांनी रावण दहन समिती व आदिवासी समाज बांधवांना ठाण्यात बोलवून ता.२४ ऑक्टोबर रोजी बैठक घेतली.अखेर सर्वानुमते निर्णय होत मारेगावात रावण दहन होणार असल्यावर शिक्का मोर्तब झाला.
दसरा म्हणजे विजयादशमीचा सण आहे.प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करुन लंकेवर विजय मिळविल्याचा आनंद दसऱ्याला रावण दहन करुन साजरा केला जातो.परंतु काही दिवसाआधी आदिवासी समाज बांधवांनी राजा रावण यांच्या पुतळ्याचे दहन करू नये अशा आशयाचे निवेदन मारेगाव ठाणेदार यांना दिले होते.परिणामी शहरात रावण दहन होणार की नाही ही बाब अस्पष्ट होती.
दरम्यान आज मारेगाव ठाणेदार जनार्धन खंडेराव यांनी पोलीस ठाण्यात मारेगाव रावण दहन समिती व आदिवासी समाज बांधवांची सभा बोलावली.या सभेत दोन्ही पक्षांनी आपली मते मांडली.अखेर सर्वानुमते यावर्षी रावण दहन होणार यावर शिक्का मोर्तब झाला.परंतु पुढच्या वर्षी रावण दहन करावयाचे असल्यास दोन महिन्या आधीच ही बाब कळवावी असा शब्द ठाणेदारांनी यावेळी रावण दहन समितीला दिला.
विजया दशमी, तथा नवरात्रोत्सव अगदी अंतीम टप्प्यात असुन दुर्गा देवी विसर्जन आहे. या काळात तालुक्यातील शांतता, सुव्यवस्था अबाधित असावी. कुठलाही अनुचित प्रकार घडु नये यासाठी तालुक्यातील जनतेने सहकार्य करावे. या काळात पोलीस प्रशासन सदोदीत सज्ज असेल.
जनार्दन खंडेराव
ठाणेदार, मारेगांव.





