– शतक कलेचा शिलेदार ठरला हरहुन्नरी कलाकार
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
वणी उपविभागातील कला क्षेत्रातील हिरा विनोदकुमार आदे यांनी आपल्या जीवनाची यशस्वी घडी बसविण्यासाठी परिस्थितीशी लढा देत यशाची गवसनी घालून आज वणी सारख्या ठिकानी आपल्या कलेच्या माध्यमातून यशाची शिखर गाठणाऱ्या विनोदकुमार आदे यांचा सामाजीक क्षेत्रात काम करणाऱ्या लढा संघटनेच्या वतीने मान्यवरच्या उपस्थितीत सत्कार करून गौरविण्यात आले .
लढा संघटनेच्या वतीने वणी येथील शेतकरी मंदीर येथे युवा संमेलन व भन्नाट काव्य मैफिल कार्यक्रम घेण्यात आला , यात सुप्रसिध्द कवी अनंत राऊत अकोला यांच्या कवितेचा कार्यक्रम व प्रा डॉ संतोष डाखरे यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमात वणी उपविभागीय भुषण विनोदकुमार आदे यांच्या विविध कलागुणाचा सन्मान करून भविष्याच्या वाटचालीसाठी लढा संघटनेच्या माध्यामातून शुभेच्छा दिल्या.
यावेळी लढा संघटनेचे प्रविण खानझोडे , अजय धोबे, विकेश पानघाटे सह विचारपिठावर जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष टिकाराम कोंगरे, लक्ष्मी नारायन पत संस्थेचे संजय खाडे, वणी वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे उपस्थित होते, अष्टपैलु कलेचा शिलेदार विनोदकुमार आदे यांच्या कला गुणाची पारख करित या प्रसंगी लढा संघटनेच्या वतीने सत्कार करून प्रोत्साहन देण्यात आले.
या कार्यक्रमात अनंत राऊत यांच्या कविताचा हजारो रसिकानी आस्वाद घेतला.




