– जुलूस ठरला मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मुस्लिम बांधवांचा पवित्र असा सण इद-ए-मिलाद-उन-नबी उत्सव ता.२८ सप्टेंबर रोजी मारेगावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी गौसीया मस्जिद येथुन निघालेला जुलुस मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला.यात शहरातील शेकडो मुस्लिम बांधवांनी मोठ्या आनंदाने सहभाग घेतला.
मुस्लिम बांधव वर्षभरात साजऱ्या करत असलेल्या सणांपैकी ईद मिलाद-उन-नबीला वेगळे आणि विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते.मुस्लिम कॅलेंडरप्रमाणे इस्लामचा रबी उल अव्वल या तिसऱ्या महिन्यातील १२ व्या दिवशी ईद मिलाद-उन-नबी उत्सव साजरा केला जातो.
जश्ने ईद-ए-मिलाद-उन-नबी उत्सवाचा उत्साह मारेगावात गेल्या दहा दिवसापासून ओसंडून वाहत होता.इदची पुर्वतयारी म्हणून स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौका पासून ते गौसीया मज्जिद पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.
दरम्यान आत्ता २८ सप्टेंबर रोजी मारेगावात इद-ए-मिलाद-उन-नबी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी येथील गौसीया मज्जिद येथुन मोठ्या दिमाखात आकर्षक असा जुलुस काढण्यात आला.
गौसीया मज्जिद येथुन निघालेला जुलुस मारेगावातील जुनी वस्ती – नगरपंचायत – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नंतर गौसीया मज्जिद येथे येऊन विसावला. यावेळी फातियाखानी पठण नंतर सदर जुलुसाची सांगता करण्यात आली.

मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जाणारा ईद-ए-मिलाद-उन-नबी उत्सव गणेश विसर्जन तसेच पोलिसांवर पडणारा ताण पाहून वेळेची योग्य सांगड घालत मुस्लिम बांधवांनी मोठ्या आनंदात साजरा केला.
यावेळी मारेगावातील यंग मुस्लिम कमिटीच्या बांधवांनी विशेष परिश्रम घेतले.




