– पोळा होतो हर्रास : ग्रामस्थांचा आगळावेगळा उपक्रम
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
शेतकऱ्यांचा परम मित्र असलेल्या असलेल्या सर्जा राजाचा सण बैल पोळा तालुक्यातील किन्हाळा येथे मोठ्या उत्साहात व आनंदाच्या ओघात साजरा करण्यात आला.यावेळी येथील ‘बैल पोळ्याचा हर्रास’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम लक्षवेधी ठरला.
वर्षभर शेतात राबणाऱ्या व बळीराजाच्या मदतीला सदैव तत्पर राहुन त्याच्या कष्ठात महत्वाचा भागीदार असलेल्या सर्जा राजाचा सण बैल पोळा किन्हाळा ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात व आनंदाच्या ओघात साजरा केला.देवस्थान कमिटीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘पोळा हर्रास’ या नावीन्यपुर्ण उपक्रमामध्ये अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या हिरीरीने सहभाग घेतला होता.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पोळा हर्रास करण्यात आला.हर्रास केलेला पोळा किन्हाळा येथील प्रगतिशील शेतकरी आत्माराम रामभाऊ गिरसावळे यांनी घेतला.परिणामी सरपंच शुभम भोयर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवुन आत्माराम गिरसावळे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

यावेळी देवस्थान कमिटी अध्यक्ष रतन आत्राम, उपाध्यक्ष आत्माराम गिरसावळे, प्रशांत तोरे, भास्कर कपाळकर, धिरज डांगाले, मुकुंद आडे, पुष्पराज गाणफाडे,विशाल सोमटकर, नितेश भोयर, मनोज आसेकर, मोहन गायधन, अनंता काथवटे, प्रवीण देठे, प्रवीण काकडे, सागर खडसे, सुनील सोमटकर, राहुल भोयर, राजू शास्त्रकार, हितेश गायधन, योगेश काथवटे , राज चौधरी यांचेसह समस्त किन्हाळावासी उपस्थित होते.




