– मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात सभा
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुका परिसरातील खैरे कुणबी समाजाची तालुका कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली.खैरे कुणबी समाज बहुउद्देशीय संस्था यवतमाळ व खैरेगड फाउंडेशन यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने मारेगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभागृहात यवतमाळ संस्थेचे अध्यक्ष साहेबराव जुनघरे यांचे अध्यक्षते खाली सभा झाली.
या प्रसंगी जिल्हा संस्थेचे एम.डी. धनरे,रमेश ठाकरे,बी.एल.काणारकर, प्रवीण मुरकुटे, शरद लोखंडे, प्रवीण मुरकुटे,प्रफुल डहाके, विजय घोटेकार प्रामुख्याने उपस्थित होते. संभाव्य समाज महोत्सव २०२३ आयोजन बाबत विस्तृत चर्चा करण्यात आली.तसेच उपवर -वधू परिचय पुस्तिका प्रकाशित करण्याचा निर्णय उभय संस्थांनी घेतलेला आहे.
सदरहू कार्यक्रमाची माहिती देण्यासंदर्भात यवतमाळ संस्थेचे पदाधिकारी मारेगाव येथे उपस्थित राहून तालुक्यातील खैरे कुणबी बांधव यांना मार्गदर्शन करून सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले. या वेळी उपस्थितांमधून तालुका कार्यकारणी निवडण्यात आली.
अध्यक्ष विजय रा.घोटेकर, उपाध्यक्ष भास्कर न.धानफुलें, सचिव मारोतराव श्रा.देशमुख ,मिलिंद वि.वटे, कोषाध्यक्ष सोमेश्वर ब. गेडेकर,सदस्य -बबन पु.झोटिंग,गजेंद्र बा. पालकर,विठ्ठल ग. हुसुकले,सुभाष बा.राऊत,विकास ना.राऊत,मनोज भा. वादाफळे,देवेंद्र दि. देवतळे, धीरज अ.डांगाले यांची निवड झाली. कार्यक्रमाचे संचालन सोमेश्वर गेडेकर तर आभार भा.न.धानफुलें यांनी पार पाडले.




