– वृक्ष लागवड : न.प.चा उपक्रम
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सांगता सोहळ्यानिमित्त देशभरात ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियानाला ९ ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे.हे अभियान १५ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे.परिणामी १३ ऑगस्ट रोजी शहरात न.प.ने वृक्ष लागवड करुन या अभियानाचा ‘शुभारंभ’ केला.
१३ ऑगस्ट रोजी ‘वसुधा वंदन’ कार्यक्रमांतर्गत शहरातील प्रभाग क्रमांक ५ निर्मिती ले आउट येथील मोकळ्या जागेत वृक्ष लागवड करण्यात आली.यावेळी कडुलिंब, आंबा, चाफा, बदाम, जांभूळ, पिंपळ आदी ७५ वृक्षांचे वृक्षारोपण करून ‘अमृतवाटिका’ तयार करण्यात आली.
यावेळी मारेगाव न.प.च्या उपाध्यक्षा हर्षाली महाकुलकर, नगरसेविका अंजुम नबी शेख, नगरसेविका वर्षा कींगरे, नगरसेवक आकाश बदकी, हेमंत नरांजे, करण किंगरे, अनुप महाकुलकर, न.प. अभियंता चव्हाण,नबी शेख,सोनु चौधरी यांचेसह न.प.कर्मचारी व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.




