– जनहित कल्याण संघटना,क्रांती युवा संघटना व पुरोगामी पत्रकार संघाचा पुढाकार
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
जनहित कल्याण संघटना मारेगाव,क्रांती युवा संघटना वणी व पुरोगामी पत्रकार संघटना मारेगाव यांचे संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्य १५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता स्थानिक शेतकरी सुविधा केंद्रात विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या गुणगौरव सोहळ्यात मारेगाव तालुक्यातील २०२२-२३ मधील माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये प्रत्येक शाळेमधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे.परिणामी पालकांसह विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या गुणगौरव सोहळ्याचे अध्यक्ष राकेश खुराणा (संस्थापक अध्यक्ष, क्रांती युवा संघटना वणी),
उदघाटक डॉ.मनिष मस्की (नगराध्यक्ष,न. पं. मारेगाव),
प्रमुख मार्गदर्शक दीपक रंगारी, (ख्यातनाम लेखक,मराठी भाषा प्रमाणलेखन, पीएच. डी. प्रबंधाचे मुद्रीतशोधन, पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव),प्रमुख मार्गदर्शक सुनयना संजय येवतकर (महिला जिल्हाध्यक्षा, अ. भा. महात्मा फुले समता परिषद यवतमाळ), प्रमुख पाहूणे गौरीशंकर खुराणा (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगाव),उत्तम निलावाड (तहसीलदार मारेगाव),जनार्दन खंडेराव (पोलीस निरीक्षक, मारेगाव),पद्माकर मडावी, (गटविकास अधिकारी प. स. मारेगाव),शंकर हटकर (वनपरीक्षेत्र अधिकारी, मारेगाव),सुनील निकाळजे (ता. कृषी अधिकारी, मारेगाव),स्नेहदीप काटकर, (गटशिक्षणाधिकारी, प. स. मारेगाव), शैलेशकुमार पाटील (अभियंता, विद्युत महावितरण, मारेगाव),कविताताई मडावी, (अध्यक्षा, जनहित कल्याण महिला संघटना मारेगाव ),सुवर्णाताई खामणकर, (सचिव,जनहित कल्याण महिला संघटना मारेगाव),भास्कर धानफुले (माजी मुख्याध्यापक – तथा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, पुरोगामी पत्रकार संघटना यवतमाळ) हे राहणार आहे.

तसेच जनहित कल्याण संघटनेचे अध्यक्ष समीर कुडमेथे, उपाध्यक्ष रॉयल सय्यद व सचिव निलेश तेलंग मंचावर उपस्थित राहणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता स्थानिक शेतकरी सुविधा केंद्रात आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यास पालकांसह विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याच्या आवाहन पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.




