– हृदयविकाराच्या झटक्याने नागपूर येथे निधन
– अवघी पंचक्रोशी शोक सागरात
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
आपल्या काळातील उत्कृष्ट शिक्षक,विद्यार्थ्यांचे सवंगडी, तबलावादक ,गायक अशी ‘ऑल राऊंड’ ख्याती असलेले मारेगावातील जिल्हा परिषद शाळेचे माजी मुख्याध्यापक विठ्ठलराव कृष्णाजी गजभिये यांचे १० ऑगस्ट रोजी रात्री ११:३० वाजे दरम्यान नागपूर येथील लता मंगेशकर रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.मृत्यू समय ते ७४ वर्षाचे होते.
आपल्या मनमिळावू स्वभावामुळे विठ्ठलराव गजभिये सर विद्यार्थ्यांचे प्रिय होते.आपला सेवानिवृत्ती कार्यकाळ पूर्ण करून आयुष्य जगत असताना काळाने अवेळी सरांवर घाला घातला.
गत काही दिवसापासून प्रकृती अस्वस्था मुळे गजभिये सरांना सोमवारी नागपूर येथील लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचेवर नियमित उपचार सुरू होते.
दरम्यान १० ऑगस्ट रोजी रात्री ११:३० वाजे दरम्यान रुग्णालयातच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने गजभिये सर काळाच्या पडद्याआड गेले.
सरांच्या अशा अवेळी एक्झिटने गजभिये कुटुंबीयांवर पुरती शोककळा पसरली असून अवघी पंचक्रोशी शोक सागरात बुडाली आहे.
गजभिये सरांच्या पश्चात दोन विवाहित मुले ,दोन विवाहित मुली, नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.




